२० व्या वाढदिवसाला परत सगळे पूर्वीचेच विचार मनात यायला लागले, तेव्हा अतिशय बोअर व्हायला लागलं. आणि असंच कोणाशीतरी बोलता बोलता मन स्वप्नरंजनात गढून गेलं. हळू हळू कसं जीवन आपल्याला आवडेल ह्याचा विचार करू लागलो.
जगणं कसं अतिसामान्य असावं! छान मोठी कुरणं आहेत, (हिरवीगार वगैरे...), रोज सकाळी उठून गाई चरायला नेतोय, शिक्षणाची गंधवार्ता नाही, कुठल्याही 'मॉड वर्ल्ड' शी संपर्क नाही, वेळ्च्या वेळी पाऊस बिऊस पडतोय, शेतं बहरतायत. मग अगदी ठरलेल्या वेळेस गुलाबी थंडी पडावी, त्यानंतर कडक उन्हाळा यावा, सगळीकडे एकतर उन्हाचा किंवा अमलतासाच्या फुलांचाच रंग उधळलेला असावा, सगळंकाही वेळच्या वेळेस अगदी ठरल्याप्रमाणे व्हावं, आणि एक दिवस सर्वं स्मृतींना परत ठेवून आपण पंचमहाभूतांमध्ये विलीन व्हावं. आपलं मोठं नाव-बिव होण्याची चिंता नाही, कुठल्याही स्पर्धेची गरज नाही...
मध्यंतरी एका गायिकेच्या जीवनाबद्दल वाच्ण्यात आलं. तेव्हा वाटलं आपणही अगदी मध्ययुगीन, गावागावातून फिरणारे लोकगीतकार असायला हवे होतो. पण ह्यासाठी भूमी हवी ती युरोप, किंवा सर्वात बेष्ट म्हणजे ईंग्लंड ची. काहीतरी गबाळे, जाडे-भरडे, मलीन कपडे असावेत, चित्रविचित्र वाद्य असावीत, (माहीत नसलेल्या लाकडाची बनवलेली) (एका सूचनेप्रमाणे ह्यात "अलगुज" हवीच!). एका गावातून दुस-या गावात जावं, आपले कपडे फाटके-तुटके असले तरीही डोळ्यात सहस्र सूर्यांचं तेज असावं, सायंकाळी आपण गावात जाऊन मंडळी गोळा करावीत, हळूहळू रात्र पडावी, आपल्या गाण्याला आणि मेंडोलीन वगैरे वाद्यांना रंग चढावा, आजूबाजूला युरोपियन वेषातले स्त्री-पुरुष असावेत, अंधारी रात्र मशालींच्या प्रकाशात अजूनच मोहमयी व्हावी, संगीताच्या सुरेख धुंदीत प्रेक्षकातल्याच एखाद्या बदामी, काळ्याभोर डोळ्यांच्या, सोनेरी केसांच्या, शुभ्र पायघोळ झगा घातलेल्या युवतीने आपल्या सुरांचा ठेका चुकवून जावे, आणि तिच्या स्मरणातच आपला मुक्कम पुढच्या गावी पडावा...
पुढची कल्पना सुद्धा ईंग्लंडादी प्रदेशावरच अधारलेली आहे. कडाक्याची थंडी असावी, बर्फ-बिर्फ जोरात पडत असावा, गावापासून दूर आपली लाकडी (किंवा दगडी, कुठलीही चालेल!) झोपडी असावी, घरात ईतस्तत: कोळ्याची जाळी असावीत, चिकार पाली-बिली असाव्यात. एक पुस्तकांचं कपाट असावं. त्यातली पुस्तकं सुद्धा साधीसुधी नव्हेत, तर जुनाट चामडी बांधणीची असावीत. (ती धुळीने इतकी माखलेली असावीत, की त्यांवरची नावं वाचता यायला नकॊत बरंका!). बाहेर तुफान वादळ चालू असावं, पण आपण आपले शेकोटीजवळ मोठी जाड दुलई घेऊन एका चर्र - चर्र वाजणा-या आराम खुर्चीवर बसलेले असावोत. हातात पिवळ्या आणि विशिष्ट वासाच्या पानांचं GOTHIC Font असलेलं, काळ्या जादूचं सचित्र पुस्तक असावं. (ह्या स्वप्नात पुढे काय होतं ह्याचा मी अजून विचार केलेला नाहीये!) वगैरे वगैरे...
खरं म्हणजे आता स्वप्नातून दचकून जागं होण्याची वेळ आली आहे, पण माझ्या बाबतीत असं फार क्वचित होतं. म्हणजे एका स्वप्नाला सुरुवात झाली की दिवसभर तेच स्वप्न मनात घोळत राहतं. अगदी स्वप्नांतही हेच स्वप्न दिसत राहतं. सत्यात जगत असतांना ही मखमली स्वप्नाची मउ मउ शाल कधी मला गुरफटून घेते देव जाणे!

7 comments:

Gayatri said...

:) फार सुंदर! तुझ्या ब्लॉगच्या नावाला साजेसं.

Mandar Gadre said...

read this today.
well, a blog is what YOU make it. so it doesn't matter if you don't "know" what a blog 'is' :)
a blog 'becomes'.

Anup said...

When do u get time to do all this!!!U r simply great.maza tuzya baddal aadar *2 zalay(in short dwigunit)

आव्या said...

shankya, tu sahi blogatoyas. keep it up.

archana said...

sahi aahe.

केदार जठार said...

कधी जायचे सांग युरोपात... तू गाणं गा.. मी विचीत्र वाद्य वाजवतो :)...
छान लिहीले आहेस. keep it up

yog said...

khupch chhan..
i become ur fan really!