पुनर्भेट
(सत्य घटनेवर आधारीत...! निदान सध्या तरी.)

मध्यंतरी एक फ्रेंच चित्रपट बघण्यात आला. अमेली त्याचं नाव. त्याच्या संगीतकाराचं एक composition ऐकत बसलो होतो. एक चिमुकले ३ मिनिटाचे गाणे, पण तेही मला योगायोग अन्‌ अनपेक्षिततेचे अमोल धडे शिकवून गेले.
सुरुवातीला एक chord वाजू लागली. मांजरीच्या पावलांइतकी शांत. तिच्या पोटातून अगदी संथपणे जलतरंगाचे सूर उमटू लागले. एक एक स्वर स्पष्ट. हळू हळू पडणा-या पावसाच्या थेंबांसारखा. स्मृतींच्या फडताळातला एक दिवस हळूच डोकवून गेला. त्या दिवशी अनपेक्षित पणे आदल्या रात्री पाऊस पडून गेला होता. सगळे रस्ते काळेकुट्ट झाले होते. मंद वारा वाहात होता. अगदी त्या जलतरंगांच्या स्वरांसारखा. थंड, मधाळ.
एव्हाना गाण्यात हळूहळू इतर वाद्यांचीही हजेरी लागायला सुरुवात झाली होती. कधी कधी होतं काय, आपले insticts इतके जबरदस्त असतात, की गाण्याची सुरुवात ऐकूनच आपल्याला कळतं, गाणं पुढे कसं असणार आहे. तो दिवसही तसाच होता. कोणीतरी अगम्य भाषेत मला काहीतरी सांगत होतं, जीव तोडून सांगत होतं, पण काय ते कळत नव्हतं. एका छान लयीमध्ये गाणं पुढे जात होतं. अशा प्रकारचं पाश्चात्य संगीत पूर्वी कधी ऐकल्याचं आठवत नाही मला. तो दिवसही असाच हळू हळू पुढे सरकत होता. बहुतेक, दस-याचा आदला दिवस असल्यामुळे आणि नुकत्याच पडलेल्या पावसामुळे एकदम मस्तं वातावरण होतं. अगदी अनपेक्षितपणे मला त्या दिवशी अळवा-पाण्याची गाठ व्हावी तशी दुर्मिळ लोकं भेटत होती. दुर्मिळ अशासाठी, की त्या लोकांशी माझा दुवा खूप वर्षांपूर्वीच तुटलेला होता. पूर्व स्मृतींना उजाळा देता देता एक -दोन घटका गेल्या. येवढ्या वर्षांपूर्वीची फक्तं "ती" एकच व्यक्ती मला प्रकर्षाने आठवत होती, आणि मन:चक्षूंचा ताबा घेत होती. आज काहीतरी वेगळं घडणार हे निश्चित होतं, पण कधी ते कळत नव्हतं. त्या गाण्याची ही तसलीच गत! सगळी वाद्यं जरा दबल्या दबल्यासारखी वाजत होती. त्यांच्यातल्या शक्तीला मुसक्याच बांधल्या होत्या जणू....
एव्हाना संध्याकाळ झाली होती. दिवस उतरणीला लागला होता. थोडसं सिंहावलोकन केल्यावर कळलं, तो दिवसही इतरांसारखाच होता. काय एक दोन आनंदाचे क्षण काय ते आले होते. ते गाणही तसच निघालं. विशेष असं काही त्या गाण्यात होईच ना! त्यातल्य़ा वाद्यांचं नाविन्य आणि त्या जुन्याच लोकांना परत भेटण्याचं नाविन्य येवढ्या दोनच "वेगळ्या" गोष्टी घडल्या होत्या. पावसाला परत सुरूवात झाली होती. एव्हाना आम्ही सर्व लोक (मी + "जुने") कुठेतरी भटकण्यासाठी बाहेर पडलो होतो. छान थंड हवा पडली होती. उरलेल्या दिवसात आता काही शिल्लक नाही हे मला कळून चुकलं होतं. वाद्यंही इथून तिथून जाऊन शेवटासाठी तारसप्तकाकडे धाव घेत होती. माझ्या त्या दिवसाकडून असलेल्या सर्व अपेक्षा सरींमध्ये विरघळत होत्या. असे अपेक्षाभंग माझे खूप वेळा झालेले आहेत!. मस्तकावर थेंब झेलंत मी उभा होतो. आकाशाकडे बघत, डोळे उघडे ठेवून पावसात उभं रहायला मजा येत होती. आता पुढचा दिवस अगदीच निरस जाणार होता. गाणंही हळू हळू अस्ताला लागलं होतं. सगळे सूर उरलेल्या थोड्याफार अवसानासकट वर वर जात बंद झाले. त्या सरींमधलीही मजा संपली होती. त्या चेह-यावर टोचायला लागल्या होत्या. सूर्योदयाने दिलेलं वचन सूर्यास्ताने मोडलं होतं. जलतरंगाचं वचन त्या शक्तीहीन वाद्यांनी मोडलं होतं. अजूनही तुषार पडतच होते...

तेव्हाच, एक क्षण, फक्तं एक क्षण ताणला गेला, आणि कोणीतरी म्हणालं: "अरे! 'ती' आली"... अचानक सर्वं वाद्यं सुरू झाली, पूर्ण ताकदीनिशी... प्रत्येक स्वर कानात घुमू लागला, प्रत्येक जागा दाद घेऊन गेली... वाद्यं मुक्त उधळू लागली... तीनही सप्तकांमध्ये त्यांचा स्वैर संचार सुरू झाला...

माझे डोळे त्या तुषारांध्ये अलगद मिटले गेले...

7 comments:

Gayatri said...

केवळ अशक्य. हे इतकं सुंदर लिहिलंयस, मला तुझं कौतुक करायची तीव्र इच्छा असूनही शब्द सुचत नाहीयेत. असंच अनुभवत राहा, आणि लिहीत राहा, प्लीज!

makarand j said...

Faarach chhan lihilays! Mandar Gadre ni muddam mala hi link fwd keli. keep it up.

Bhagyashree said...

wow !! pratyek vakya dolyasamor chitra mhanun ubha rahila.. mi itaka oghavate kadhi vachla navta... jasa jasa shevatcha para javaL yayla lagla tasa tasa vachana cha speed vadhat gela maza..
khup bhari !! :)

neeraja said...

actually hi shili comment asel pan kharach khoop sundar lihila aahes...asach lihit raha :)

yog said...

khup sundar..

Saee said...

kharach. Gayatrisarkhach zalay mala.
It is very difficult to be so sensitive. I am not sure of the sanity of my earlier statement, but if it is 10 difficult to be so sensitive to yourself, it is 10000 difficult to express it so well.
Sometimes, writing takes the form of a grasshopper walking on a tender grass blade without breaking it. This writing is like that grasshopper's walk. :)
Bravo!!

Shashank Kanade said...

Saee taaI, dhanyawaad!
tumhI lok agdI speechlessch karUn Taaktaa buaa.