Crazy Ideas (1)

नाविन्य: Roads and Songs, Before Sunrise.

देवाने जीवनात प्रचंड सुसूत्रता करून ठेवली आहे. गरज असते, ती फक्त डोळस पणे बघण्याची. एखादं गाणं एखाद्या प्रसंगाची आठवण करून देतं, एखादी आठवण एखादं स्वप्नं देवून जाते... आणि ह्या नंतर ह्या सगळ्यांकडे बघितल्यावर कळतं, त्या जगन्नियंत्याला एकच गोष्ट सांगायची होती, फक्त माध्यमं वेगळी होती. हे सगळं फार romantic होतंय खरं. पण मला जी गोष्ट सांगायची आहे, ती आहेच मुळी विचित्र.

तर झालं असं. मी ७ वी ते १० वी शाळेला cycle ने जायचो. एकदा मला रस्त्यावरून जातांना असं आढळलं, की रोज त्या पथावरून जाताना, माझं लक्ष त्याच त्या खाणाखुणांकडे जातं. म्हणजे अगदी घरापासून सुरुवात केली, की वीराच्या मारुतीपासच्या रस्त्यावर माझ्याकडून road divider कडे बघितलं जाणारंच. हमखास. त्यानंतर न. म. शा. पाशी ब-याच वेळा शाळेच्या गेट कडे लक्ष जाणार. त्यानंतर एका छोट्याश्या गल्लीतून लक्ष्मी रोड ला लागताना एका watch company च्या दुकाना कडे लक्ष गेलंच पाहीजे. शाळेतून घरी येताना एक particular नील फलक वाचला जाणारंच. काही काही दुकानं तर अशी होती, की ज्यांच्या पाट्या माझ्याकडून रोज न चुकता वाचल्या जायच्या. आपोआप. सवयच लागली होती मानेला आणि नजरेला. मला मोठी मौज वाटली. मग मी अजून एक मजा करायचं ठरवलं. एकदा मी असं मानलं की आपण ह्या शहरात नवीनच आलो आहोत. आणि प्रयत्नपूर्वक दुसरीकडेच बघायला सुरुवात केली. काही काही buildings च्या कडे मी कधीही बघत नसे, त्यांच्याकडे बघितलं. वेगळ्या दुकानांच्या पाट्या वाचल्या. रस्त्यावरच्या इतर खुणा टिपायला लागलो. आणि गम्मत म्हणजे रस्त्यांचा पूर्ण चेहरामोहरा आणि स्वभावच बदलून गेला. काही रस्ते मला कुरूप वाटायचे ते एकदम सुंदर झाले, तर काहींचं एकदम उलटं झालं! हल्ली सुद्धा मी कधी पुण्याला गेलो, की हा प्रयोग करून पाहतो. जाम मजा येते!

3rd semester मध्ये मी Enya च्या संगीताच्या अक्षरश: प्रेमात पडलो होतो. त्यानंतर ती गाणी मी पुष्कळ वेळा ऐकली. The Corrs च्या गाण्यांचंही असंच झालं. ही गाणी मी इतक्या वेळा ऐकली की त्यांच्या आत्म्याचा हिरण्यगर्भ पूर्णपणे झाकोळला गेला. एकदा Corrs चं गाणं ऐकत असताना त्यात एक नविनच वाद्य वाजत असल्याचं आढळलं. मग मी ती गाणी परत नव्याने ऐकायला सुरुवात केली. आणि त्यांचाही कायपालट झाला. Corrs च्याच एका गाण्याचा video खूप वेळा बघून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की गाणं एका विशिष्ट ठिकाणी आल्यावर माझं लक्ष Andrea वाजवत असलेल्या Tin Whistle कडे जाणारंच. मग मी ते जाणीवपूर्वक बदलायला सुरुवात केली आणि गाण्यांना नवीन बहार आला. एकदा घरी अगदी वेगळ्या वातावरणात Enya ची गाणी ऐकली आणि ती पहिल्यांदा ऐकताना जसं वाटलं होतं, तसंच वाटलं अगदी. एकदम सही. पण एक गोष्ट आहे. एखादं संगीत प्रथम ऐकतांना जसं वाटतं, तंतोतंत तसं परत कधीच वाटत नाही. ती नाविन्याची मजा काही औरच असते.

आमच्या घारासमोर एक वाडा आहे. तो मूळ दुमजली वाडा होता. त्याच्या उजव्या बाजूला त्यापेक्षा थोडा उंच पारसनिस वाडा आणि डाव्या बाजूला चार मजली इमारत आहे. तर, त्या समोरच्या घराच्या भिंतीमधून पिंपळ उगवला आणि त्या वाड्याच्या पडझडीस कारणीभूत ठरला. कालांतराने त्या वाड्याचं Apartments मध्ये रूपांतर करायचं ठरलं. त्याचा वरचा मजला पाडून टाकण्यात आला. आणि ते काम रखडलं. आता दोन्ही बाजूंना वाडे, इमारती, आणि मध्ये हा बुटका एकच मजला. त्यातून पावसाळ्य़ात ह्या वाड्याच्या उघड्या बोडक्या भिंतीच्या टकलावर छानपैकी हिरवळ उगवायला लागली आणि तो वाडा सर्वप्रकारे गमतीदार दिसू लागला. मग आता मी ह्याही वाड्याचा "मानसिक कायापालट" करायच ठरवलं. एकदा बाकीच्या सगळ्या गोष्टी पुसून टाकल्या फक्त मागची मुठा नदी आणि झाडी राहू दिली. वाड्यावर सायंकाळची तांबूस उन्हे टाकली. आणि त्याला एकदम ऐतिहासिक भग्नावशेष करून टाकला. नंतर काही दिवसांनी पुण्यात थंडी वाढली, म्हणून सगळीकडे "मानसिक बर्फ" पाडला! त्यावेळेस विचारसागरात मुद्दाम खडे मारून तयार केलेले ते तरंग तर केव्हाच विरून गेले... आता उरलंय ते फक्तं त्यांचं शब्दचित्र!

नाविन्य म्हणजे तर जीवन आहे. हजारो वर्ष चंद्राची एकच बाजू बघून मानव जेव्हा कंटाळला, तेव्हा त्याने त्याची दुसरी बाजू न्याहाळायला उड्डाण केलं. नाविन्य म्हणजेच तर जीवन आहे... गरज असते, ती फक्त डोळस पणे बघण्याची!

10 comments:

Nandan said...

hmm, interesting. आत्म्याचा हिरण्यगर्भ aaNi मानसिक कायापालट/बर्फ aavaDala. kadhi kadhi asaa muddam make-believe vichaar karaNa/dRuShTikon change karaNaa hee thoDeeshee prataaraNaa kelyaasarakhee vaaTate (kaa te sangta yet nahi), paN yaat majaa yete he maatra khara.

Shashank said...

nakki koNashi prataaraNaa?

Parag said...

Good one! This is good way of changing routine things without actually changing those ;-) changla lihila ahe.

Prasad Chaphekar said...

agdi barobar ahe.. mhaNin tar me ekda ekhada gaNa baghitlyawar punha baghtana hero heroie peksha magchya extrankaDech baghat basto. tyanche havbhav Tipto.. ata klhara sangaycha tar tya "अधिका" (म्हNजे extras) kahi agdeech waeeT disat nahit. kahi kahi tar heroine peksha changlya distaat!.. sawayi pamane tu hyala frustugiri mhaNNar he mahit ahe mala.. paN tarihi.. blog madhle wichar tantotant paTle mala...

Vidya Bhutkar said...

मस्तच! कल्पना खूप आवडली, अंमलात आणून पाहते लगेचच. तेव्हढाच बदल रोजच्या रस्त्यावर. गाण्यांबद्दल तर हे एकदम खरं आहे. हल्लीच 'तुझसे नाराज नही जिंदगी' ऎकलं आणि मग पुन:पुन्हा ऎकत राहीले. प्रत्येकवळी वेगवेगळे शब्द-स्वर आवडले. मजा आली.

सलिल said...

एकदम सही
बर्फाने विरुन गेलेल्या आठवणींना दिलेली उपमा महान आहे..झकास
या गोष्टीवर विचार करुन त्याचे इतके उत्तम analysis करणे ही पण एक special गोष्ट आहे :)

Gayatri said...

Crazy Ideas (n++) wanted!
'देवाने सुसूत्रता करून ठेवलीय' या विधानावरून आठवलं. "chaos is the ultimate reality" असं मानणाऱ्या मला आमच्या श्रीहरी सरांनी फार छान वाक्य टाकून गप्प बसवलं होतं: 'Disorder is only a higher dimensional order.' :) नावीन्याबद्दल मला वाटतं आपण आधीपण बोललो होतो..विशेषत: रस्त्यांबद्दल. नुसता बघायचा "अँगल" बदलला तरी किती नवीन दिसतं सारं.. आपण नेहमी आपल्या दृष्टीच्या पातळीवर +/- बघत चालतो. जऽरा नजर उंचावली तर तोच रस्ता कितीतरी वेगळा दिसतो!
तुझं वाड्याचं कल्पनाचित्र खासच आहे.

सहज said...

interesting..o could relate this to the concept of 'paradigm shift'

karun baghato, lagech...:)

Kedar_Jathar said...

चन्द्रावर जाण्यामागचे कारण आवडले :).. good work.. keep it up

Adwait Kulkarni said...

apratim!