॥कोप राग॥
राग, आग, कोप डंख,
अंग, अंग - भंग भंग.
आजचा हा रंग लाल,
तप्त लोह - गाल, भाल.
मध्य, मंद्र, तार तार,
आरडणार, ओरडणार.
नाभीतून चीतकार,
मुखी फक्त "भ"कार.
आदळ-आपट - खाड्, खाड्,
वही, कागद - फाड, फाड!
हृदय, नाडी - ताड्, ताड्,
तडित् जशी कडाड्, कडाड्!
द...म... दमलोऽऽऽ
प...ड... पडलोऽऽऽ
जीभ तरीही बोलणार,
"यल्गाऽर, यल्गाऽर"!
---
(कविता जमली नाही की असं होतं. कवितेचं अन् माझं, दोघांचही)
4 comments:
> कविता जमली नाही की असं होतं.
>
'ज़मली नाही' असं का म्हणताय? ज़मली आहे की चांगली.
"कविता जमली नाही की असं होतं." हे लिहिताना मात्र छान कविता जमली!
sahi ch... 'na jamaleli' kavita jar ashi asel tar 'jamaleli' kavita tar baap re... maan gaye ustaad.. :)
अरे ही खूप खरी कविता आहे! परवा कशानेतरी माझं डोकं जाम फिरलं होता. तेव्हा ही कविता अक्षरशः माझ्या डोक्यात वाजत होती..! तू जबरी आहेस! :)
Post a Comment