टप्पा (२)
एक आठवड्यापासून बाहेर ढगांचं बेक्कार धुमशान चाललंय. पोट फोडून ओरडतायत, जोशात आकाश कापत अख्या खंडावर पसरतायत. शांत चित्ताने, दुलईत गुरफटून त्यांची मजा बघताना खूप आनंद होतोय. अरे होती एक संध्याकाळ अशीही --- येड्या लोकांबरोबर, तिसर्याच देशात, कोपर्यातल्या एका शहरात, ठिकठिकाणच्या युवक-युवतींच्या आवाजात आवाज मिसळून झकास गाणी गात होतो. अरे होता एक काळ असाही, जेव्हा दर आठवडा नवीन शहरात जन्म घेत होता; नवीन, बहुरंगी, बहुढंगी पराग-कणांशी भेट घडवत होता. काय योगायोग, अगदी त्याच वेळेस Kerouac चं "On the road" हाती होतं. अक्षरश: पाककलेच्या पुस्तकात बघून जेवण बनवावं तसं त्या पुस्तकात बघून आयुष्य जगणं चालू होतं. एक-एक स्वप्न असं पूर्ण होत गेलं की काय मस्त वाटतं! जीवनातल्या काही अविस्मरणीय प्रसंगांची ती एक फक्त सुरुवात होती. तेजस्वी स्मरणिकांच्या तरूणरेखा जन्म घेत होत्या....
गेल्या महिन्यात त्या गाण्याच्या कंपूला "आच्छा" म्हटलं. आता नवी सुरुवात!
"कसं वाटतं हो तेव्हा, जेव्हा तुम्ही लोकांपासून दूर जात असता आणि वेगाने छोट्या होत जाणार्या त्यांच्या आकृत्या क्षितिजावर जाता जाता इतस्तत: विखरून अदृश्य होतात? तो कदाचित त्या लोकांचा घेतलेला निरोप असतो, हे अवाढव्य भूमंडळ आपल्यावर झेप घेत असतं आणि ह्या चिरंजीवी तारकांच्या साक्षीने आपण पुढच्या येड्या साहसासाठी सज्ज होतो. " --- Jack Kerouac
------
"टप्पा" हा संगीत प्रकार ऐकला आहेत कधी?
------
खिडकीतून डोकं बाहेर काढल्यावर तुफान वार्याबरोबर दाही दिशांना उडणार्या केसांप्रमाणे "ब्राउन ची चाल" जगला आहात कधी?
4 comments:
Beat lifestyle ला बीट नाही! तू कॅरुऍकवर अजून लिही ना रे. मराठीत आणला पाहिजे त्याला. The only people for me.. वालं त्याचं वाक्य जातच नाही डोक्यातून.
हो - टप्पे ऐकले आहेत - परवीन सुलतानाचे आणि मालिनी राजूरकरांचा भैरवीतला. कायमच्या नसलेल्या निरोपाला भैरवीचा टप्पा काय चपखल बसतो! तो दुवा सांधून दिल्याबद्दल खूप धन्यवाद.
आणी हो - ब्राऊनची चाल जगते आहे...खिडकीशिवायच , वार्यावर सवार होऊन ;) बोलो चालीत चाल, पराग चाल!
गायत्री ताई,
"पराग चाल" गं, ते एकच सत्य आहे आयुष्यातलं. आपण परत भेटू, तेव्हा माझ्याकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी असणारेत.
आणि केरूआक चं म्हणशील, तर ते एक वाक्य अगदी "Holy Grail" झालं आहे.
लवकरच आपण परत भेटू आणि ह्या अतीव सुंदर "
पराग चालीचा" आढावा घेऊ. मला तुझ्या पराग चालीबद्दल बेक्कार उत्सुकता आहे.
sahi :)
apratim...!!!!!!!!!!
Post a Comment